Case Studies

वास्तूशास्त्र केस स्टडी - १

Vastu Case Study


पार्श्वभूमी:


सौ. वनिता यांना वास्तू शास्त्राची आवड होती, परंतु योग्य मार्गदर्शन कुठून मिळवायचे हे त्यांना माहित नव्हते. त्यांनी थोडीफार माहिती YouTube आणि इतर ठिकाणांवरून घेतली, परंतु त्यांच्या जागेत काही समस्या असल्याचे जाणवत होते, तरीही त्या समस्यांचे कारण नेमके काय आहे, हे त्यांना स्पष्टपणे कळत नव्हते. सौ. वनिता यांना त्यांच्या नातेवाईकांकडून माझा नंबर मिळाला आणि त्यानंतर त्यांनी माझ्याशी भेट घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांच्या घराला भेट दिली.


मुख्य समस्या:


सौ. वनिताचे घरातील मुख्य समस्या खालीलप्रमाणे होती:


  • संबंधातील तणाव: सौ. वनिता आणि त्यांच्या पतीमध्ये लहान-मोठ्या कारणांवरून वाद होतात, त्यामुळे दोघांचे एकमेकांशी सहकार्य कमी होते.

  • पारिवारिक अस्वस्थता: त्यांच्या मुली घरात त्रास देतात, ज्यामुळे त्यांना व्यवसायात प्रगती साधता येत नव्हती.

  • आर्थिक अडचणी: दक्षिण-पश्चिम (SW) कट असल्यामुळे त्यांच्या आयुष्यात स्थिरता येत नव्हती आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत होता.

  • घरातले वातावरण: घरात शांततेचा अभाव आणि चिडचिडेपणा जाणवत होता, ज्यामुळे मनःस्थिती बिघडली होती.

वास्तू दोष:


  • एन्ट्री E1: घरातील मुख्य एन्ट्री बिंदू E1 चे स्थान अपायकारक होते.

  • आग्नेय कट: आग्नेय दिशेत कट असल्यामुळे आग्नीतत्व कमी झाले आणि त्यामुळे चिडचिडा स्वभाव व आर्थिक तंगी वाढली.

  • पश्चिम दिशेतील गॅलरी: पश्चिम भागात गॅलरी असल्यामुळे सौ. वनिता यांनी झाडे लावली होती, ज्यामुळे वाद आणि भांडणे वाढत होती.

  • रेड कलरचे पडदे: घरातील सर्व खिडक्यांवर रेड कलरचे पडदे असल्याने घरात अशांतता निर्माण झाली होती.

  • NNW मध्ये टॉयलेट: NNW भागात टॉयलेट असल्यामुळे पती-पत्नीच्या संबंधांमध्ये तणाव वाढला.

  • ENE मध्ये गॅस: ENE भागात गॅस असल्यामुळे वरील समस्यांना दुजोरा मिळाला.

उपाययोजना:


वरील सर्व समस्यांचे तपासणीनंतर, योग्य उपाययोजना सुचवण्यात आल्या. सौ. वनिताने या उपाययोजना योग्य पद्धतीने अमलात आणल्या.

परिणाम: काही दिवसांच्या आत, सौ. वनिता आणि त्यांच्या कुटुंबाला सकारात्मक अनुभव आले. घरातील चिडचिडेपणा कमी झाला आणि वातावरण आनंदी झाले.

Client Testimonials



Our sincere thanks who generously shared their enriching experiences, insightful reviews, and invaluable feedback. We lead the way in pioneering the most advanced Vastushastra techniques to infuse serenity into home and office.


वास्तूशास्त्र केस स्टडी - २

आरोग्य आणि समृद्धी

Vastu Case Study


पार्श्वभूमी:


आधुनिक युगात नवीन प्रॉपर्टी खरेदी करणे हे सहसा एक आनंददायी अनुभव असते. तथापि, काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष न दिल्यास आपल्या आनंदावर विरजण येऊ शकते. सौ. सोनल मॅडम यांची कथा यावर एक उदाहरण आहे. सौ. सोनल मॅडम आणि त्यांच्या कुटुंबाने एक नवीन प्रॉपर्टी घेतली, ज्यामुळे त्यांच्या आई-वडील आणि भाऊ आनंदित झाले.

सुरुवातीच्या दीड-दोन वर्षांच्या निवासात सर्व काही सुरळीत होते. पण अचानक गंभीर समस्यांचा सामना करावा लागला. त्यांचा भाऊ नोकरी गमावला, आणि तीव्र डिप्रेशनमध्ये गेला, ज्यामुळे तो दारूच्या आहारी गेला. त्याचवेळी, वडिलांना कॅन्सरचा निदान झाला. या सर्व समस्यांनी सोनल मॅडम अत्यंत चिंतित झाल्या आणि मार्गदर्शनाची आवश्यकता भासू लागली. सुदैवाने, त्यांनी श्री वास्तू विज्ञान यांच्याबद्दल माहिती मिळवली आणि त्यांच्या घराची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.


मुख्य समस्या:


सौ. वनिताचे घरातील मुख्य समस्या खालीलप्रमाणे होती:


  • आर्थिक अडचणी: आग्नेय दिशेत (SE) एक कट असल्यामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या.

  • घरातील वातावरण: दक्षिण दिशेतील बेडरूम वडिलांचे होते, जिथे प्रचंड प्रमाणात ज्योगेओपॅथिक स्ट्रेस (GS) आढळला, ज्यामुळे वडिलांच्या गंभीर आजाराचे मुख्य कारण ठरले.

  • संबंधातील ताण: नैऋत्य (SW) कोपऱ्यात सदैव झाडे असल्यामुळे घरात वाद-भांडणांचे वातावरण तयार झाले.

  • डिप्रेशनचा ताण: पश्चिम-उत्तरे (WNW) भागात भाऊ झोपत असल्यामुळे त्याला डिप्रेशनच्या ताणातून मुक्त होण्यात अडचणी येऊ लागल्या.

  • चिडचिडीपणा: पूर्व-उत्तरे (NE) भागातील किचनमुळे संपूर्ण कुटुंबातील चिडचिड वाढली.

निष्कर्ष:


या सर्व समस्यांचा विचार करून योग्य उपाययोजना केल्या गेल्या. हळूहळू, भाऊ पुन्हा सावरू लागला आणि काम करण्याची इच्छाही पुनर्जीवित झाली. GS असलेल्या भागात योग्य उपाययोजना केल्याने सकारात्मक परिणाम दिसून आले.


उपाययोजना:


वास्तूशास्त्राचा विचार न करता घेतलेली प्रॉपर्टी आपल्या आरोग्यावर आणि मानसिक स्वास्थ्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते. त्यामुळे, लाखो रुपयांचे कर्ज घेऊन घर खरेदी करताना वास्तूशास्त्राच्या तत्त्वांचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. अनुभवी वास्तूतज्ञांचा सल्ला घेणे हा एक महत्त्वाचा पाऊल आहे, जो आपल्या जीवनात आनंद, आरोग्य, आणि समृद्धी आणण्यास मदत करतो.